खोपोली: (प्रतिनिधी ) खोपोली नगर परिषदेमार्फत शहरात फक्त एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. काजूवाडी येथील पाण्याची टाकी दुरुस्ती करण्याकरिता एक महिन्याचा कालावधी लागेल व त्याकरिता नगर परिषदेने एकच वेळ पाणीपुरवठा सुरू केला होता. चार महिने होऊन सुद्धा नगर परिषदेने अजूनही दोन वेळ पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून सुद्धा नगरपरिषद जाणून-बुजून खोपोलीच्या नागरिकांना त्रास देत असून पाणीपुरवठा सुरळीत करत नाहीये.
नगरपरिषद घरपट्टी पाणीपट्टी वसुली करिता वसुली मोहीम राबवते परंतु नागरिकांना सुविधा देण्यासाठी तत्परता दाखवत नाही. टाकीचे काम पूर्ण झालेले आहे तरी आपण पाणीपुरवठा दोन वेळ सुरू करावा याकरिता आम आदमी पार्टी पाठपुरावा करत असताना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत खोपोलीला एक वेळ पाणीपुरवठा पुरेसा आहे व आता दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे.
खोपोलीकरांच्या हक्कासाठी व तहानलेल्या खोपोलीला पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता आम आदमी पार्टी 2 सप्टेंबर 2025 रोजी खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले.
कर घेत आहात तर सुविधाही द्या अन्यथा कर घेऊ नका. खोपोलीला सुरळीत दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले आहे.



Post a Comment
0 Comments