साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ठाणे व महानगरपालिका ठाणे यांच्याकडून तुषार कांबळे यांचा सन्मान
ठाणे : ( परमेश्वर कट्टीमणी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंती उत्सवाच्या भव्य सोहळ्यात, ठाणे शहरात प्रभावशाली युवा व बहुआयामी सामाजिक व राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे सचिव – महाराष्ट्र प्रदेश, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले श्रमिक ब्रिगेड तथा संस्थापक अध्यक्ष तथ्य योद्धा यांना “समाजगौरव सन्मान” देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान मा. शंकर पाटोळे, उपायुक्त – ठाणे महानगरपालिका यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, मा. कुसुमताई बाबासाहेब गोखले, समितीचे पदाधिकारी अध्यक्षा – सौ. अनिता मोटे, कार्याध्यक्ष – सौ. नंदाताई सोनावणे, सचिव – सौ. मिनाक्षी शिरसाठ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या वेळी मान्यवर म्हणून मातंग समाज नेते अभंग शिंदे उपस्थित होते. तर संतोष भाऊ सगट (शिवलहू सेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक), पत्रकार योगेश नवगिरे, शिवसेनिक दीपक आवारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तुषार तानाजी कांबळे म्हणाले :
“हा पुरस्कार माझा नसून तो संपूर्ण समाजाचा आहे. मातंग समाजाच्या ऐक्य, संघर्ष आणि प्रगतीसाठी हे प्रेरणादायी यश आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रकाश आम्हाला नेहमी मार्गदर्शक ठरेल.”
या भव्य जयंती उत्सवात समाजातील अनेक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण ठाणे भगव्या तेजाने उजळले व सामाजिक ऐक्याची जाणीव सर्वांना अनुभवता आली.

Post a Comment
0 Comments