Type Here to Get Search Results !

*समाजाचा आवाज ठरलेले पत्रकार आकाश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*



    खोपोली : (परमेश्वर कट्टीमणी) साप्ताहिक बहुजन संकल्प व रायगड संकल्प न्यूज या माध्यमांचे संपादक तसेच खोपोली–खालापूर परिसरातील सक्रीय पत्रकार म्हणून ओळखले जाणारे मा. आकाशजी जाधव यांचा वाढदिवस आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामाजिक भान जपत, जनतेचे प्रश्न धाडसीपणे मांडणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणारे आकाश जाधव यांना विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



    आकाश जाधव हे खोपोली शहरातील रहिवासी असून, शिक्षणानंतर त्यांनी इमॅजिका या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळी नोकरी केली होती. मात्र नोकरीपेक्षा समाजकार्य आणि पत्रकारिता हेच खरे ध्येय असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी धाडसाने नोकरीचा राजीनामा दिला आणि पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, तरी चिकाटी, परिश्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी यामुळे त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.



   पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक गंभीर घटना, अपघात, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या अडचणींवर सखोल अभ्यास करून त्या बातम्यांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. परिणामी अनेकांना न्याय मिळाला आणि समस्या सोडविल्या गेल्या. “पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.



    याशिवाय खोपोली व खालापूर परिसरात आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिरांत आकाश जाधव स्वतः रक्तदान करून पुढाकार घेतात. समाजात रक्तदान संस्कृती वाढावी या हेतूने त्यांनी विविध शिबिरांचे आयोजन केले असून, यामुळे अनेकांना संकट काळात रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली. तसेच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे, हा त्यांचा सततचा प्रयत्न असतो.


   पत्रकारितेबरोबरच क्रीडा क्षेत्राशीही त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. खोपोली पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धांचे ते प्रमुख आयोजक असून, खेळाडूंना प्रोत्साहन देणे, संघटितपणा वाढविणे आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे, या हेतूने त्यांनी अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पत्रकार संघातील तसेच खोपोलीतील अनेक युवकांमध्ये त्यांचा आदर आहे.



   आज आकाश जाधव यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून मर्यादित राहिलेली नाही, तर ते अनेकांचा नेते, नगरसेवक, अध्यक्ष किंवा खरेखुरे “भाई” म्हणूनही परिचित झाले आहेत. त्यांच्या होशियार व मनमोकळ्या स्वभावामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांच्याकडे आत्मीयतेने बघतात.


   त्यांच्या पत्रकारिता प्रवासातील प्रामाणिकपणा, समाजकार्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पाहता भविष्यात ते आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतील, असा विश्वास त्यांच्या शुभेच्छकांनी व्यक्त होत आहे.


  आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त “बेधडक महाराष्ट्र” परिवारासह आकाश जाधव यांना  उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी भवितव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत.



  *पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या या वाटचालीत त्यांना नेहमीच सोबत राहिलेले पत्रकार तय्यब खान यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. या दोघांची मैत्री ही खोपोली, खालापूर, कर्जत ते संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. राम-रहीमच्या घट्ट मैत्रीप्रमाणे त्यांची जिवलग ओळख सर्वत्र चर्चेत असते. लोकांमध्ये ही जोडी आदर्श मैत्रीचे उदाहरण मानली जाते.*

Post a Comment

0 Comments