मुंबई : मोदी सरकारने देशातील ऑनलाईन गेमिंग व जुगार थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे. Dream11, MPL, Poker, Rummy, My11Circle यांसारखे पैसे भरून खेळले जाणारे सर्व ऑनलाईन गेम्स आता कायद्याने बंद होणार आहेत. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असून समाजात समाधानाचे वातावरण आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश – सचिव आरपीआय (आठवले) – श्रमिक ब्रिगेड चे तुषार तानाजी कांबळे म्हणाले,
"ऑनलाईन जुगाराच्या नावाखाली सुरु असलेले व्यसन आता थांबणार आहे. मोदी सरकारचा हा धाडसी निर्णय देशातील तरुणाईसाठी टर्निंग पॉईंट ठरेल. पैशाच्या नादाने उद्ध्वस्त झालेली कित्येक घरं या कायद्यामुळे वाचतील. आम्ही या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करतो."
तसेच तुषार कांबळे यांनी पुढे सांगितले :
"तरुणाईने आता शिक्षण, रोजगार आणि समाजकार्यात लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय तरुण पिढीला योग्य दिशा देणारा ठरणार आहे. समाजाचे रक्षण आणि भविष्यातील पिढीचे प्रगतिशील घडवणे हे या ऐतिहासिक पावलामागील खरे यश ठरेल."

Post a Comment
0 Comments