Type Here to Get Search Results !

खोपोलीत ऑक्टोबर मध्ये रायगड बिजनेस एक्स्पो 2025 :

 



     खोपोली..रायगड जिल्ह्यातील व्यवसायवृद्धी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी खोपोली येथे ‘रायगड बिझनेस एक्सपो २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘रायगड बिझनेस इनिशिएटिव्ह्स’ तर्फे होणारा हा मेगा एक्सपो १३ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडणार असून, जिल्ह्यातील उद्योजक व गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.


     एक्सपोमध्ये ११० हून अधिक स्टॉल्स उभारले जाणार असून १५ पेक्षा अधिक क्षेत्रातील उत्पादने व सेवांचे प्रदर्शन होणार आहे. या ठिकाणी उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि नागरिक असे ३० हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित आहेत.


    या कार्यक्रमाला राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती तसेच आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, हा एक्सपो सर्वात तरुण महिला आयोजकाद्वारे होत असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


   स्थळ : जुना मुंबई–पुणे महामार्ग, लायन्स क्लब कम्युनिटी सेंटरजवळ, खोपोली (जि. रायगड).


   या उपक्रमाच्या संचालिका सागरिका योगिता शेखर जांभळे आहेत. सामाजिक कार्यात लहान वयापासून सक्रिय असलेल्या जांभळे यांना विविध संस्था व प्रशासनाने गौरवले आहे. त्या सहज सेवा फाउंडेशनच्या युवा अध्यक्षा तसेच लिओ क्लब ऑफ खारघरच्या अध्यक्षा आहेत.


   तीन दिवसीय कार्यक्रमाची वैशिष्ट्ये


   १३ ऑक्टोबर : व्यावसायिक व प्रशासन यांच्यातील संवाद मेळावा


    १४ ऑक्टोबर : नवीन व्यावसायिकांसाठी व्यवसाय मेळावा तसेच उद्योजिका बनुया यासाठी महिला उद्योजक मेळावा


   १५ ऑक्टोबर : भव्य नोकरी मेळावा



    एक्सपोदरम्यान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध उपक्रम आणि लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.


   अधिक माहितीसाठी संपर्क : ८८३०६ २९२९५ / ९९७५४९२४७०

   ई-मेल : raigadbusinessinitiatives@gmail.com / info@raigadbusiness.com

   वेबसाईट : www.raigadbusiness.com

Post a Comment

0 Comments