मुंबई दि.17 ~ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे सहकुटुंब लंडन दौऱ्यावर गेले असून येत्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी लंडन दौरा यशस्वी करून ना. रामदास आठवले मुंबईत परतणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे येत्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात येणार आहे. येत्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आपले लाडके राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले यांच्या भव्य स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे.
लंडन दौऱ्यावर ना.रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले पुत्र जीत आठवले तसेच अविनाश कांबळे; सौ माधुरी अविनाश कांबळे चंद्रशेखर कांबळे हे सुद्धा लंडन दौऱ्यात ना.रामदास आठवले यांच्या समवेत आहेत.लंडन दौरा यशस्वी करून ना.रामदास आठवले यांचे मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी मुंबईत आगमन होणार आहे.त्या वेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना. रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; सरचिटणीस विवेक पवार ; सुनील बन्सी मोरे यांनी दिली आहे.यावेळी मुंबईतील रिपब्लिकन वरिष्ठ नेत्यांसह रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; अजित रणदिवे;रमेश गायकवाड; संजय पवार; प्रकाश जाधव आदी जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment
0 Comments