Type Here to Get Search Results !

⚡ पत्रकार शिवाजी जाधव यांची तत्पर दखल : अपघातानंतर काही तासांत उमरजी पटेल नगर परिसरात पुन्हा उजेड.



         खोपोली: (प्रतिनिधी): खोपोली शिलफाटा परिसरात शनिवारी संध्याकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास एक मोठ्या कंटेनरने उमरजी पटेल नगरजवळील मोठ्या नाल्याजवळ असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे उमरजी पटेल नगर, उमरजे पाटील नगर आणि यशवंतनगर या परिसरात अचानक अंधार पसरला. परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.



    घटनेची माहिती मिळताच स्थानिक पत्रकार शिवाजी जाधव यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी वीज विभाग (M.S.E.B.) च्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लगेचच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आणि अल्पावधीतच वीजपुरवठा पूर्ववत झाला.



     शिवाजी जाधव यांच्या या तत्परतेचे आणि जबाबदारीच्या भावनेचे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. रहिवाशांनी सांगितले की, “पत्रकार शिवाजी जाधव यांच्या वेगवान कृतीमुळे परिसर पुन्हा उजळला आणि आम्हाला मोठा दिलासा मिळाला.”



    त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे पत्रकारितेचा मान अधिक उंचावला असून, समाजातील समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या पत्रकारांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments